EMAIL US AT chetana.emp@gmail.com
CALL US NOW +91 8805358652 | +91 8830434807
DONATE NOW
January 7, 2024 at 10:30 am

11th Annual Day

स्मार्ट कोण ! मी कि माझी स्क्रीन ? या जनजागृती अभियानाला गती देण्याचा चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशन च्या वर्धापन दिनी संकल्प.

सध्या समाजात प्रत्येक वयोगटात मोबाईल व इतर स्क्रीन मुळे होणारे मानसिक दुष्परिणाम व समाजवेवस्थेवर होणारे परिणाम याची दाखल घेऊन चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशनने ‘युज स्क्रीन वाईजली’ या अभियानाची सुरुवात ५ वर्षांपूर्वी केली.  या अभियानामुळे अनेकांनी स्क्रीन चा वापर गरजेपुरताच करण्याचा संकल्प केला व अनावश्य्क स्क्रीन च्या वापरामुळे वाया जाणारा वेळ वाचविला व स्वतःला या तणावातून मुक्त केले.   या अभियानाची संकल्पना व पुढील दिशा यासंबंधीची माहिती सौ मिताली लाठी, उपाध्यक्ष, चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशन यांनी संस्थेच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त दिली.

चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशन चा ११ वा वर्धापन दिन रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी चेतना हैप्पी व्हिलेज (पळशीजवळ) अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.  यावेळी संस्थेचे अध्यक्ष सी ए विवेक रांदड यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशनचेतना हैप्पी व्हिलेज निर्माण करण्यामागील उद्देश व चेतना आपल्या तीन प्रोजेक्टच्या माध्यमातून जे सामाजिक कार्य करीत आहे त्याची माहिती दिली. यामध्ये चेतना जीवन निर्माण आणि चेतना विद्या  सहाय्यता, व्हॅल्यू एडुकेशन, मेंटल वेलनेस, डिजिटल वेलनेस सारखे प्रोजेक्ट आहेत.  चेतना हैप्पी व्हिलेज निर्माण मध्ये समाजातील अनेक समाजसेवी शुभचिंतक प्रतिष्टीत नागरिक , सामाजिक संस्था व उद्योग जगत यांचे मार्गदर्शन व सहकार्य वेळोवेळी मिळत असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले व त्यांच्याविषयी ऋणनिर्देश केला.

मान्यवरांचे स्वागत-सत्कार व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, चेतना जीवन निर्माण च्या विद्यार्थ्यांनी कविता सादर करून एक अनोख्या पद्धतीने आपल्या ध्येयाचा व प्रयत्नाचा परिचय करून दिला.  सौ मिताली लाठी यांनी चेतनच्या ११ वर्षाच्या कार्याचा अहवाल सादर केला.   चेतना जीवन निर्माण मध्ये एकूण २१७+ विद्यार्थ्यांना दत्तक व ९९ विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून सहकार्य केल्याची माहिती दिली. मेंटल वेलनेस अंतर्गत ३२७ पेक्षा अधिक वेबिनार द्वारे ६३५४१ + लोकांमध्ये मानसिक सशक्तीकरण संबंधी जनजागृती केली.  डिजिटल वेलनेस या उपक्रमांतर्गत शाळेत, सामाजिक संस्थेत व चेतना हैप्पी व्हिलेज मध्ये ९६१+ एवढे कार्यक्रम झाले व ६६९१२ + लोंकांना संदेश दिला.

यावेळी उद्योगपती श्री प्रदीपजी धूत, जॉईंट कमिशनर ऑफ इनकम टॅक्स श्री किरणजी देशपांडे, अंबाजोगाई एस आर टी मेडिकल कॉलेज चे प्रोफेसर व मेडिसिन डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार यांनी चेतनाच्या कार्यासंबंधी समाधान व्यक्त करून शुभेचछा दिल्या.

या कार्यक्रमास माजी महापौर बापू घडामोडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल जी गायकवाड, जी एस टी चे अससिस्टन्ट कमिश्नर हुंडेकरी मॅडम, तसेच लायन्स, जायंट्स, माहेश्वरी शहर संस्थेचे पदाधिकारी, उद्योजक, डॉक्टर्स, चार्टर्ड अकाउंटंट, इंजिनिर्स, व मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातील अनेक सन्माननीय हितचिंतक व समाजसेवी,  चेतनाचे एडव्हायजर व सर्व सभासद  उपस्थित होते. सौ गायत्री रांदड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मुरली गुंगे पाटील, सचिव यांनी आभार मानले.

SHARING IS CARING

NEWSLETTER SIGN-UP

Subscribe to get latest news about Chetana.